Ezekiel 17

गरुडांचा ल द्राक्षवेलीचा दुष्टान्त

1परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला. 2मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग. 3सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत ते लबानोन पर्वतावर गेला व त्यांने देवराराची फांदी मोडून टाकली. 4त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्याला कनानात घेऊन गेला त्याला व्यापाऱ्यांच्या शहरात लावले.

5त्याने त्यातले काही बिज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भूमीत जेथे विपुल पाणी होते तेथे वाळुंजासारखे लावले. 6मग त्याची वाढ होऊन द्राक्षाचे झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते.

7पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि पाहा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या, त्याला रोपन केल्या पासून त्याला विपुल पाणी घातले होते. 8त्याला सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपन केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले, त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली.

9हे घडेल का? लोकांना असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहुबल कोणताही जनसमुदाय त्याला उपटून टाकणार नाही. 10मग पाहा! त्याला रोपन केल्यावर त्याची वाढ होईल, ते सुकून जाणार नाही? जेव्हा पूर्वेकडील वारा त्याला स्पर्श करेल? ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल.

11मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला 12बडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहित नाही का? पाहा! बाबेलचा राजा यरुशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन, बाबेलात जाईल.

13मग राजवंशाला घेऊन जाईल, त्याच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल. आणि भूमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल. 14मग राज्य रसातळाला जाईल मग उच्च पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करुनच भूमीवर वावरता येईल.

15पण मिसऱ्यांनी त्याला घोडे बहुत लोक द्यावेत म्हणून तो आपला राजदुत पाठवून त्याजविरूद्ध बंड करेल तो यशस्वी होईल का? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल का? 16माझ्या जीवताची शपथ असे परमेश्वर देव जाहीर करतो तो निश्चीत राज्याच्या भूमीत मरेल ज्याने त्याला राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्याला तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल.

17फारो आपल्या पराक्रमी बाहूबलाने अनेक लोकांना जमवेल युध्दाने त्याचा बचाव होणार नाही, जेव्हा बाबेलाच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुव्वा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील. 18करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले, पाहा! तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही.

19यास्तव परमेश्वर देव असे सांगतो जसे मी शपथेने म्हणतो, त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले? म्हणून मी त्याच्या माथी मी शासन आणिन; 20मी आपले पाश त्याच्यावर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेल, मग त्याला बाबेलात नेईन आणि शासन अमलात आणिन जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला. 21आणि त्याच्या बाहुबलाचे सर्व शरणस्थान तलवारीने मोडले गेले, आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी परमेश्वर देव आहे, मी जे बोलले ते घडेल.

22परमेश्वर देव हे म्हणतो, मग मी स्वताःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वताःला उच्चस्थानी स्थापील. 23मी त्यांना इस्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली रहातील, ते त्यांच्या फांद्यां मध्ये घरटे करतील.

मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेल; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहिर केले आहे ते घडेल.

24

Copyright information for MarULB